शिक्षणाच्या नावान चांगभल - Story

शिक्षणाच्या नावान चांगभल”
लेखक: प्रशांत व्यवहारे
आज पुष्करच्या मनामध्ये सकाळ पासूनच विचारांचा कल्लोळ चालला होता! शाळेत मुलांना शिकवतांना त्याचा लक्ष्यच आज काही केल्या लागत न्हवत! आज त्याची कन्फर्म रुजू ची आर्डर पोस्टाने येणार होती होती, व त्यामुळे तो सकाळ पासून पोस्टमन काकाची आतुरतेने वाट पाहत होता!   डी. एड झाल्या नंतर पुष्कर तीन वर्षा पासून ज़िल्हा परिषद् शाळेत शिक्षण सेवक म्हणून काम पाहत होता,    सकाळ पासून त्याने दोन तीनदा हेडमास्टर सरांच्या केबिन मधे जाउन आर्डर बद्दल चौकशी केली!आनी आता तो चौथ्यांदा हेड सरांच्या केबिन च्या दरवाज्या बाहेर उभा होता.पुष्कर: हेड सर आत एउ का!हेड सर: या पुष्कर, अरे हो तुमची आर्डर अजुन आली नाहीं बरे का !पुष्कर:  आता पर्यंत तर यायला हवी होती सर, शिक्षण सेवकाचा कालावधी संपल्या नंतर सम्पूर्ण दोन महीने झाले बिन पगारी आहे!हेड सर: पुष्कर समजू शकतो हो तुमची घालामेल, एके काळी माझी पन तुमच्या सारखीच अवस्था होती ! काळजी करू नका हो , ते आताचे अधिकारी चांगले आहेत आनी माझे कन्फर्म बोलन झाले आहे त्यांच्या सोबत, आज ना उदया नकी येईल आर्डर ठीक आहे! पुष्कर: ठीक आहे सर तुम्ही आहात म्हणून आम्हाला आधार आहे, नाहीं तर कोण कुठला कोणाला अशी मदद करते!हेड सर: मदद वगैरे नाहीं हो पुष्कर, ते फ़क्त तुमचे शिक्षणातले कौशल्या बघून बाकी काही नाहीं, बर हां ते आर्डर मिळाल्यावर पार्टी च विसरु नका बर!इतक्यातपोस्टमन काका हेड सरांच्याकेबिन मधे शिरतात!पोस्टमन: हो हो तर सरपार्टी तर पुष्कर मास्तरनीदयालाच पाहीजे!कारनत्यांच्या नावाच एक पाकिट शिक्षणअधीकारी ऑफिस मधून आलेआहे! बहुदा आर्डर असेल!हेऐकून पुष्कर आनन्दित झाला!पुष्कर: हो काका दया ना,  मीकेव्हाची वाट बघतोय! पोस्टमनएक खाकी रंगाचे पाकिट पुष्करच्या हाती देतात! पुष्करते उघडून बघतो आनी त्याच्याडोळ्यातून आश्रू वहायला लागतात!हेडसर: काय हो पुष्करकाय  झाले! अचानक एवढे भावनिक झालात!      पुष्कर: सर माफ़ करा पन हे आनंदाचे आश्रू आहेत आज माझ्या आई वडिलांनी केलेले कष्ट पूर्ण झाले! माझी ही   कन्फर्मेशनची आर्डर आहे! पनदुसऱ्या गावाला चार्ज दीला, दहीगांव ला जायचे आहे७ दिवसात अस हे पत्रम्हणते!हेडसर: अरे वा , अभिनन्दनपुष्कर !पोस्टमनकाका: अभिनन्दन हाँ पुष्कर सरआता पेढ़े दीले पाहीजेतुम्ही!पुष्कर: हो नक्कीच उद्याच घेऊन येतो पनउदय तुम्ही या!हो नक्की असे म्हणून पोस्टमन काकातिथुन निघून जातात! हेडसर पुढची कागदी कार्यवाही करून, पुष्करला परत वर्गा मधेजायला सांगतात!पुष्करव त्याचे परिवार करीता आजचा दिवस जणूफार सुखाउन टाकनारा होता! पुष्कर एक शेतकरी मजूरकुटुंबातला होता! त्याचे वडील शेती वआईने मजूरी करून त्याला शिकवलेहोते! बारावीनंतर कस बसे डी, एड करून व भर्तीपरीक्षा पास करून पुष्करतीन वर्षा पूर्वी शिक्षण सेवक म्हणून लागलाहोता! तसे तीन हजारपगारात काय होते! पनतो कसा बसा काटकसरकरून जीवन जगत होतात्या तीन हजार मानधनावर जेसुद्धा नेहमी लेट व्हायचे!पनआता त्याला कन्फर्म ची आर्डर मिळालीहोती!त्याच आनंदाच्या भरात तोवर्गात परत गेला व मुलांना शिकवायलालागला!संध्याकाळीतो घरी जात नाहीतोवर बातमी घरी पोहोचली होतीहेडसर पुष्कर ला त्यांच्या मोटरसाइकिलवर त्याच्या घरी सोडून आले!     घरी येताच त्याने आनंदाने आई व वडिलांनाबाहेरूनच आवाज दिला!पुष्कर:आई बाबा बाहेरया कुठे आहात तुम्ही!आई:  होहो लेकरा थांब मीठ भाक़रउतरवते !पुष्करची आई आनी बाबादरवाज्यात आले, आई नेपुष्कर वरुन मीठ भाकरओवाळून टाकली आनी पुष्कर घरातआला पुष्कर: बाबा हे बघा परमनेंटची आर्डर येत्या ७ दिवसात दाहिगावले रुजू व्ह्यायचे आहे!बाबा: लेकर तुझे अभिनन्दन आजआम्ही दोघे खूप खुशआहोत, दुपारीच पोस्टमन भाउ ही बातमीआम्हाले सांगून गेले ! आई: दाहिगावले जायचे चल बाई तुझीतैयारी करून दया लागल! लाम्बाचा प्रवास है !बाबा: अवा तैयारी नंतर कर पहलेगोड जेवण वाढ भुकलागली आसान त्याले !आई: हो हो लेकरा लवकरहात पाय धुवा दोघाइलेजेवण वाढते !    आज या क्षणी आई वडिलांनाखुश बघून पुष्कर लाजीवनात खूप काही मिळवलेअसे वाटत होते!पुढचे पांच दिवस हा हां म्हणतानिघून गेले !सहाव्या दिवशी पुष्कर चाशेवटच दिवस शाळेत हेडसर व इतर शिक्षकांनीएका छोटेखानी कार्यक्रमात उरकला! त्याचेविद्यार्थी दुखी होते तरीहीत्यांनी पुष्कर ला एक आठवणीतराहिल असा त्याचा दिवसघालवला कोनी आज मस्ती केली नाही की अभ्यासात कसूर!शेवटचेतास मुले फ़क्त पुष्करचालला म्हणून दुखी होते हेपुष्कर ला दिसल्या शिवायराहिले नाहीं !पनकाय करणार!शाळासुटण्यास काही मिनट बाकीअसतांना हेड सर त्याचेवर्गात आले !  चलापुष्कर सर निरोप दयाआता लेकरांना, त्याहीले काही दिवस करमनारनाहीं अस दिसते, तेअसो पन तुमच्या समोर पूर्ण आयुष्यपड़ल आहे!पुष्कर: हो सर, हे बघालेकरांनो मी आता दुसऱ्या गावाले बदली वर चाललोआहे ! आता तुम्हाले दूसरेसर येतील त्यांना त्रास देऊ नका! चांगलामन लाऊन अभ्यास कराआन पास व्ह्या, खूपमोठ बना आपल्या आइबापाचीकाळजी करा ! येतो मी आताअस म्हणून पुष्कर बाहेर पड़ला !वर्गाबाहेरपडतांना त्याला मुलांचे हुन्द्के ऐकु आले, पनमागे वळून पाहील तरमुले जाऊ देणार नाहींम्हणून त्याने मागे वळून पाहीलनाहीं.     दुसऱ्यादिवशी सकाळी लवकरच आई वडिलांचा निरोपघेऊन व आपले सामानघेऊन तो दाहिगाव लाजायला निघाला. पहिली बस पकड़ून तो तालुक्याच्या गावीगेला व तिथुन दाहिगावची बस त्याने पकड़ली!    बसमधे तशी बरीच गर्दीहोती !पुष्करआधी बसला होता म्हणूनत्याला जागा मिळाली, काहीवेळात गर्दी कमी झाली आनबरेच लोक उतरले, पुष्करच्याशेजारील सीट रिकामी झालीहोती तिथे एक म्हाताराबसला ! म्हतार्यानेपुष्कर कड़े बघितले म्हातारा: गुरुजी कुठे निघाले म्हणायचे!    पुष्कर: काका दहीगावला शाळेवर रुजू व्हावयाचे आहे,माझ्या परमनेंट ची आर्डर निघालीआहे !म्हातारादाहिगाव ऐकून दचकला म्हातारा: दाहिगाव ! अहो पन गुरुजीते तर अडानी लोकांचेगांव आहे तिथे तुमचेकाय काम !पुष्कर: म्हणूनच तर तिथल्या लोकांनासाक्षर बनवावे असा सरकारी निर्णनआहे व म्हणूनच माझीनियुक्ति तिथे झाली असेंन.म्हातारा: अहो तसा नहीं गुरुजी, अहो ती कर्मदरिद्री लोक काय शिकणार! असो तुम्ही जा मग माहीतपडेल तुम्हाला!  तितक्यातबस अचानक थांबली, कंडक्टर खेकसला अहो आबा उतराकामरगाव स्टॉप आला तुमचा, उतरताआता का नेउ पुढे!पुष्करच्याजवळ बसलेला म्हातारा कंडक्टरकड़े रागने पाहत घाईने उतरलाआनी बस पुढे निघाली!रस्तातसा खराब होता पनबहुदा आजु बाजूला बागायतीशेती असल्यामुळे खिड़की मधून थंड हवायेऊ लागली त्यामुळे पुष्करला झोप येऊ लागली!त्यालाझोप लागणार इतक्यात बस परत धुळउडवत अचानक थांबली, त्या झटक्याने पुष्करला जाग आला ! आनीपरत कंडक्टर ओरडला, चला दहीगांव वालेप्रवाशी उतरा लवकर !हे ऐकताच पुष्कर झटक्यात उठला आन त्याचीब्याग घेऊन खाली उतरला!      उतरल्यावरत्याला काही लोक तिथेउभे दीसलेलगबगीन एक खाकी कपडेघातलेला मानुस त्याचे पुढे आला, बहुतेकतो शाळेचा शिपाई असावा !तुम्हीपुष्कर गुरूजी का !  पुष्कर: हो मीच पुष्कर आहेतुमच्या गावात शिक्षक म्हणून माझी बदली झालीआहे !शिपाई: हो मी शिपाई बाबूआहे सर, हेड सरांनीतुम्हाला घ्याला पाठवल मला आना तीब्याग मी घेतो !आनीत्याने ती ब्याग घेऊनतिथेच उभ्या असलेल्या बैल गाडीत ठेवली आनी पुष्कर लाबैल गाडीत बसवून ती गाड़ी हाकततो निघाला.पुष्कर: गांव दूर आहे का, आनी आपली शाळा कुठे आहे!बाबू: शाळा ती आता नाहीं होगुरूजी, हेड सर सांगतीलचतुम्हाला !पुष्कर: शाळा नाहीं म्हणजे !बाबू: अहो गुरूजी गावातील गटांचे राजकरण किती ख़राब असतेह्याचे हे गांव उदाहरणचबनल आहे !माहीतपडेल तुम्हाला अजुन काय सांगू!पुष्करआता कोड्यात पड़ला, शाळा नाहीं म्हणजे, अस कस, हेकाय गौड़ बंगाल आहे!   तोविचार करत होता इतक्यातएक मोटर धुराळा उडवतव हॉर्न वाजवत त्यांच्या बैलगाड़ी शेजारूंन  जोरातगेली,  कीत्यामुळे बैल बिथरले ज्यांना आवरताना बाबू ला बरीच कसरत करावी लागली, वरुनपुष्कर व बाबू दोघेधुळी मधे माखले गेलेबाबूने गावरान शिवी हासडली ! रामरावच्या तर…. पुष्कर: कशी हे लोक गाड़ीइतक्या बेदरकार पने चालवतात ! गाड़ीतर विदेशी दिसते !बाबू: काय बोलणार सर ह्यांना, इथलेलोक असेच देशी भलेगाड़ी विदेशी !पुष्कर: कोण हे रामराव् !बाबू: रामराव तालुक्यातील फार मोठे जमींनदारव राजकारणातील वजनी व्यक्तित्व पनअंगठा बहादुर, आपली  शाळाबंद करण्यामागे ह्यांचा पन हात आहे!पुष्कर: म्हणजे ते कस कायबाबू: अहो सर गावात दोनगट आहेत, एक सरपंचाचा आनएक रामरावाचा, रामराव तसे मोठ्या मनाचेहोते पन गावातील काहीलोकानी त्यांना सरपंचा विरुद्ध भडकाउन दिल आनी मगरामरावांचा स्वभाव बदलला, पहीले ते गावातील राजकारणातभाग घेत नसत पनकाही स्वार्थी लोकांच्या सांगण्यावरुन त्यांनी सरपंचा विरुद्ध निवडणुकीत स्वतचे पैनल उभ केल! आनी सरपंचा विरुद्ध खूप अप-प्रचारकेला ! पन तरीही पुनःसरपंचच निवडून आले ! हयामुळे त्यांच्या तालुक्यातील राजकारणी वर्चस्वला धक्का बसला असा कहीलोकांनी त्यांच्या मनावर बिंबवले.आनीमग तवापासून गावात कुरघोड़ीच राजकारण सुरु झाल ! गावातीलसारी विकास कामे ठप्पा झालीआन आपली शाळा सुद्धात्यामधे बळी पडली ! पुष्कर: शाळेचा व राजकारणाचा कायसंबंध.बाबू: सर मोठा संबंध आहे, दोन वर्षापूर्वी तालुक्यात खूप पाऊस झाला, शाळा इमारतीची अवस्था खूप जूनी होतीव त्यामुळे पावसाळ्यात शाळेच छप्पर उड़ाल, भिंती पडल्या, त्या दुरुस्त करण्यासाटीहेड सर व सरपंचह्यांनी प्रयत्न करून निधी मंजूरकरवला व काम हीसुरु झाले ! पन ती जागापूर्वी रामराव च्या पूर्वजांच्या मालकीचीहोती ज्यावर शाला आहे मगकाय रामराव ह्यानी काही कारस्थाने केलीव वरुन कोर्ट आदेश आनुन, ते काम अर्ध्या मधातचथांबवल जे की आजतायागतपूर्ण झाले नाहीं ! आताआपली शाळा बिन भिंती,छप्पराची कशी चालणार ! लोकांनीत्यांची मुले शाळेत पाठवायचेबंद केली मग कायशाळा नाहीं तर कसले शिक्षण!पुष्कर: मग हेड सरानी दुसऱ्याठिकाणी शाळा सुरु केली नाहीं का!बाबू: हेड सरानी तर खूप प्रयत्न केलेदुसऱ्या जागी शाळा सुरु करण्याचेपन जागोजागी रामरावानी अडथळे आनुन गुंड पाठउन ती सुद्धा बंद पाडली !आतातुम्हीच सांग ह्या राजकारणी लोकांच्याभांडणात त्या मुलांचा कायहो दोष.पुष्कर: मामला तर फारच गंभीरदिसतो ! काही तरी करायलापाहिजे !इतक्यातत्यांची बैल गाड़ी एकाठिकाणी थांबली, तो एक छोटारास्ता होता व त्यारस्त्याच्या मधेच ती मघाचीकार उभी होती, त्यामुळेबैल गाड़ी पुढे जाऊशकत न्हवती! गाड़ीच बोनेट उघड होता, त्यामधूनधुर नीघत होता वएक तरुणी त्या गाडीच्या बाजूलाउभी होती !बैलगाड़ी दिसतच ती गाड़ी जवळआली !तरुणी: अहो दादा जरा माझीगाड़ी बंद पडली थोड़ीमदद करा ना !बाबू:औ ताइसाहेब मघा जेवा तुम्हीधुर उड़वात गेला तुम्हाला कळलेनहीं रस्त्यावर दुसरी पन लोका चालतात, तेव्हा तर तुम्ही खूपउडत होता ! आता काय झालहवा संपली का इम्पोर्टेड सवारीची! मदद बिदत काही मिळणारनाहीं चला व्हा बाजूला!तरुणीनेपुष्कर कड़े पाहले, तीलावाटले हां तरी काहीमदद करेल !  तरुणी: अहो निदान तुम्ही तरी मला मददकरा !पुष्कर: बाबू थोड़ा थाम्ब ! कसेही असल तरी ह्याबाई आहेत ह्यांची मददकेलीच पाहिजे !बाबू: ठीक आहे सर !पुष्करगाड़ी कड़े गेला व त्याने इंजन कड़ेबघितल, ह्याचे मैन्युअल कुठे आहे ! तीतरुणी मैन्युअल घेऊन आली !त्यामधेजनरल प्रोब्लेम्स एंड सोलूशन्स चाएक चार्ट दिला होता त्यामधेइंजन गरम झाल्यावर कूलैंटचेक करण्याचे निर्देश देलेले होते! पुष्कर ने चेक केलेतर खरच कूलैंट संपल्यामुळेइंजन ओवर हीट झालेहोते व त्याचा अलार्मवाजून ही गाड़ी नथांबवल्यामुळे गाड़ी कंप्यूटर नेस्वताच बंद केली होती! पुष्कर: मैडम, कूलैंट संपले अस दीसते, काही स्पेयर मधेठेवले आहे का गाड़ीमधे !तरुणी: माहीत नाहीं, गाड़ी माझ्या बाबांचीआहे !पुष्कर: बर थंड पाण्याची बाटलीआहे का  तुमच्याकड़े!तरुणी: हो, तुम्हाला तहान लागली का!पुष्कर: नाहीं हो तुमच्या गाड़ीलातहान लागली ! कूलैंट संपल्या मुळे इंजन ओवरहीट झाले आहे, थंडपानी टाकले की तिची तहानभागेल आन मगच तीतुम्हाला पुढे नेयील !तरुणी: ओह, ठीक आहे ! तिनेगाडीतील फ्रिज मधल्या काही पाण्याच्या बाटल्याकाढून पुष्कर कड़े दिल्या, पुष्करने त्या कूलन्ट टैंकमधे टाकल्या, थोड्या वेळात इंजन थंड झाले !पुष्कर: ओके मैडम आता इंजनसुरु करा !तरुणीने स्टार्टर फिरवतच गाड़ी पुनः सुरुझाली !तरुणी: थैंक यु खरच तुम्हीमाझी खूप मदद केलीत्याबद्दल धन्यवाद मी राधा रामराव्पाटिल तुमचे नाव काय म्हणालात.पुष्कर: मी पुष्कर चोपड़े, ह्या गावच्या शाळेतशिक्षक म्हणून रुजू झालो आहे, अच्छा तुम्ही गाड़ी थोड़ी हळूचालवा उन्हाळयाचे दिवस आहेत, गाड़ीमधेकूलैंट टाकायला सांग नाही तरअसच गाड़ी बंद पडतजाईल !तरुणी: ओके किती पैसा घ्यालतुम्ही !पुष्कर: अहो मैडम पैसे नकोहो फक्त माझ्या काढूनएक मनुष्य म्हणून ही मदद समझा! तरुणी: ओके थैंक यू अगेन, भेटूयातया घरी कधी तरी पैसानहीं कमीत कमी तुम्हालामेजवानी देइल या तुमच्यामदती बद्द्ल !पुष्कर: ठीक आहे राधा मैडमभेटुयात या !राधागाड़ी घेऊन पुढे निघूनगेली !पुष्करबैल गाडीत बसला आन बाबू पुनः बैल गाड़ी चालवु लागला!थोड्यावेळात ते गावात पोहचलेगावातील लोक बैल गाड़ीकड़े नवा मानुस आलाम्हणून कुतुहलाने पाहु लागलेअसाचएक म्हातारा साइकल वर चालला होतात्याने बाबू ला विचारला! म्हातारा: बाबू कोई हाएत हेपाव्हणे !बाबू: अहो हे आपले शाळेचेनविन गुरूजी आहेत, आजच बदली होऊंइथे आपल्या गावात आले आहेत !म्हातारा: आर पन शाळा कुठेसुरु आहे बाबा, लवकारकाही तरी करा, पोरांनाभी कधी पासून शाळेचीआस लागली आहे!पुष्कर: हो आजोबा गावातले लोक साथ देतीलतर काही दिवसात करूकी सुरु !म्हातारा: चांगले होईल गुरूजी तसाझाला तर चला निघतोभेटु, या जेवायले कदीतरी आमच्या घरी, आस म्हणूनतो म्हातारा पुढे निघून गेला.बाबू : सर लोकांना असे वायदे करू नका सर तुम्हाला खरे परिस्थीती किती गंभीर आहे हे महित नाहीं !पुष्कर : बाबू अहो आपणच नहीं म्हटला तर ही लोक कशी आपल्यावर विश्वास करतीलबाबू : हो सर, ते ही बरोबर आहे म्हणा !  आताबाबू ने बैल गाड़ीएक मोठ्या घरा समोर थाम्बवली!पुष्करत्यातून उतरला तसाच एक मानुसधावत बाहेर आला बाबू: ज्ञानू भाउ तुमची बैलगाड़ी संभाळा आनी त्याने गाड़ीचा कासरा ज्ञानू कड़े देऊन पुष्कर चीब्याग उचलून घरात दाखल झाला, पुष्कर सुद्धा त्याच्ये मागे चालत त्या घरात शिरला!तोएक जूना वाडा होता, त्याने दारावरिल पाटी वाचली, “माधवपाटिल सरपंच दाहिगाव्” !घरातशिरताच एक दोन गृहस्थत्याच्य समोर आले ! यापुष्कर मी हेड मास्टरआदिनाथ आनी हे यागावचे सरपंच आनी आपले आश्रयदाते माधव भाऊ !माधवभाऊ: या गुरूजी तुमचाप्रवास का झाला !पुष्कर: हो तसा चांगला झालाभाऊ, विचारल्या बद्दल धन्यवाद.आदिनाथ: पुष्कर तुमची राहण्याची सोय इथे सरपंचसाहेबानी केली आहे ! पुष्कर: सर तुमच्या सोबत आपल्या शाळेबद्दलबोलायचे आहे !आदिनाथ: म्हणजे आहो गावात शाळा फ़क्त नावापुर्तीआहे ! ती तुरतास सुरुहोण्याचा काहीच अंदाज नाही,तुम्ही काहीदिवस इथे रहा, बदलीकरीता अर्ज करा, मंजूरझाला की मग जा!पुष्कर: नाहीं सर मी गावातपरत शिक्षण सुरु करण्याबद्दल म्हणतआहे !  माधवभाऊ: अहो पुष्कर गुरूजी आम्हाला सुद्धा ते हव आहे ! पनकाय करणार काही लोकांनी बांधकामबंद पाडले आहे व जरग्रामपंचायत मार्फ़त सुरु करतो म्हटलातर तो रामराव आड़वायेतोय ! पुष्कर: सर कोन म्हटल कीशाळेला पक्की ईमारत लागते जर तुम्ही परवानगीदयाल तर मी एखाद्यामैदानावर सुद्धा मुलांना शिकवण्यास तयार आहे !माधवभाऊ: गुरूजी मानल तुम्हाला ! तुमचेविचार तर खरच खुपचांगले आहेत, हेड सर मी ह्यांच्या कामातमदद करण्यास तयार आहे !पुष्कर: सरपंच साहेब तुम्हे आज सांध्याकाळीच ग्रामसभा बोलवा आन गावातल्या लोकांनाशाळा पुनः सुरु करण्याबद्दलसांगा, मी उघड्या माळरानात किवा गोठ्यात सुद्धामुलांचे वर्ग घेऊ शकतो!माधवभाऊ: ठीक आहे पनरामराव् गुंड प्रवृति चामानुस आहे तो प्रसंगीतुमच्यावर हल्ला ही करू शकतो!पुष्कर: माझ्या मागे माझे वृद्धाआई वडील आहेत, जेस्वतःची देखभाल करू शकतात, म्हणूनकाळजी नसावी मी तयार आहेकुठला ही धोका पत्करण्यास!आदिनाथ: ठीक आहे पुष्कर मीपन तुझ्या सोबत आहे ! मलातुझ्या सारख्या निर्भिड सोबत्याचीच गरज होती आताशिक्षणासाथी लढु, मेलो तरीबेहत्तर पन आता मागे हटनारनाहीं !माधवभाऊ: शाबास रे पट्ठे, चलातुम्ही लोक आता आरामकरा मी ग्राम पंचायतीतजाउन संध्याकाळच्या सभेचे आयोजनाच बघतो!संध्याकाळीठरल्या प्रमाणे ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले !पारावारसगळे सदस्य सरपंच हेड सर, पुष्कारव गावातील जानते लोक बसले होतीव खाली समस्त गावकरीमंडळी!सरपंचबोलण्यास उभे राहिले !माधवभाऊ: गावकरी मंडळी आजची तातडीची सभाएका ख़ास कारणकरीता आयोजितकेले आहे, ते कारनआहे आपली शाळा पुनःसुरु करनेबाबत !शाळेचेकारन ऐकून सर्व गावकरी मंडलीआपसात कुजबुजायला लागले !एकगावकरी: पन सरपंच बांधकामावरतर स्टे आहे कोर्टाचा!इतक्यातपुष्कर जागे वरुण उभाराहिला आनी बोलायला लागला!सरपंचसाहेब व् गावकरी मंडलीमधे बोलण्याकरीता माफ़ करा, पनस्टे फ़क्त बांधकामावर आ,हेशिकवण्यावर नाहीं, आन आम्ही ते करण्यास तयारआहोत !सरपंच: हे आपले शाळेचे नविनशिक्षक पुष्कर सर आहेत, वह्यांच्या म्हणण्यानुसार जर तुम्ही ग्रामस्थ तुमच्या मुलांनापाठवण्यास तयार असाल तरहे त्यांना शिकवतील !दूसरागावकरी: पन साहेब आपल्याकड़ेदुसरी जागा कुठे आहे!सरपंच: त्यावर ही आम्ही मंडळीनीविचार विनिमय करून तोडगा काढलाआहे! आपल्या कड़े गावच्या कोंडवाड्याची गोठ्याची रीकामी ईमारत आहे! जी साफ़करून तिथे वर्ग भरवण्यातयेतील!तसाठराव आम्ही पास करत आहोतव त्या करता तुम्हीगावकरी लोकांच मत आम्हाला आजहव आहे!तुम्हीलोकांच्या परवानगी व सोबती शिवाय आम्हीहे करू शकत नाहीं! आज शिक्षणाला किती महत्व आहेहे तुम्ही गुरूजी च्या साहसा वरुणदिसून येते ! आन मला वाटतेत्यांचे शिक्षण व आपली मुलेशिकावी ह्यकरता तळमळ हीच त्यांची खरीताकद आहे!चांगलेशिक्षण हेच आपल्या मुलांचेभविष्य सुधारु शकते ऐसे मलामनापासून वाटते !तरह्या कठिन पन महत्वाच्याकामात तुम्हा लोकांची आम्हाला साथ लाभु शकेलकाय हां आज माझातुम्हे लोकांना सवाल आहे व्याचे उत्तर सगळ्यानी द्यावाचे आहे हो किवानाहीं !आतातुम्हीच विचार करा !सगळेगावकरी आता विचारात पडलेकी आता रामरावच्या विरोधातकस जायच !इतक्यातते सकाळी भेटलेले म्हातारे आजोबा उभे रहीले म्हातारेआजोबा: मास्टर मी माझे नातूशाळेत पाठवण्यास तयार आहे ! जरगुरूजी स्वतःचा  विचारन करता आमच्या मुलांनाशिकवण्यास तयार आहेत तरही तर आमची मुलेआहे त्यांच्या भविष्याचा , शिक्षणाचा विचार आम्ही करायला हवा !आजोबांचीहिम्मत बघून अजुन काहीलोक उभे राहीले, आनीबगता बगता काही वेळातसगळे गावकरी उभे रहीले आनीसमस्त गावातील लोकांनी "हो आम्ही सोबतआहोत " असा एक साथसुर लगावला !आनीमग काय दुसऱ्या दिवशीगावकरी मंडली नी ती ईमारतसाफ केली, तिथे पुष्कर आनीहेड सर यानी मुलांनाशिकवण्याची तयारी केली आन थोड्याचवेळात गावातील लोक त्यांच्या मुलांनाया नविन शाळेत घेऊनआले !ह्या नवीन शाळेचे काही दिवस चांगले गेले, पन ह्यानविन शाळेच प्रकरण रामरावाना समजले त्यांची ताळपायची आग मस्तकात गेली!एकदिवस पुष्कर शाळा संपवून परतयेत होता तेव्हा रस्त्या मधे एक जीप त्याच्यासमोर येऊन जोरात थाम्बली!त्यातूनअचानक १०-१५ पैलवानमानस उतरली आनी त्यांनी त्यालाघेरल !एकपैलवान : ए मास्टर तूकशायला मरायला रामरावा बरोबर पन्गा घेतला गावातील शाला पुनः सुरुकरून, आता गप गुमानआमच्या बरोबर चल नहीं तरमुसक्या बान्धुन घेऊन जाऊ !पुष्कर: ठीक आहे चला तरमग ! जर या चांगल्याकामाकारिता कोनी मला सजादेत असेल तर तीमी हसत हसत स्वीकारायलातैयार आहे !तेलोक पुष्कर ला एक जीपमधे बसउन एक मोठ्याअश्या बंगल्या वर घेऊन आले!त्यातीलएक मोठ्या दीवान खाण्यात त्याला नेण्यात आले, तिथे नेताबारोबर एक गुंडाने  पुष्करला अचानक जोरात ढकलले त्यामुळे पुष्कर खाली जमीनीवर पड़ला.खाली पडल्यावर व एवढे लागल्यावरसुद्धा पुष्कर उठूंन उभा राहीला तेव्हाच !एकगुंड : सावकार बघा आम्ही त्यामास्टर्ड्याला उचलून घेऊन आलो , हांबघा तो !पुष्करने पाहिले की  तिथल्याएक सोफ्यावर एक मानुस बसलेलाहोता, तो रागाने त्याचेकड़े बघत होता !पुष्कर: रामराव् तुम्हीच का !रामराव्: हो मास्टर्ड्या मीच ! माझी तबियत कायबिघडली काही दिवसात तुम्हीलोकांनी तर शाळा परतसुरु केली म्हणे ! आताथाम्ब तिथेच मी तुझी कबरचखोदतो !पुष्कर: मला जरी तुम्ही जीवेमारले तरी आज नउदया अजुन कोनी गुरुजीयेईल, तो ही शाळापुनः सुरू करेल आनीतुम्ही काही ही करूशकणार नाही!पुष्कारचउत्तर ऐकून रामराव् चापारा एक़दम चढला ! आनीत्यानी तिथे ठेवलेली बन्दूकउचलली आनी पुष्कर वरनेम धरला पुष्करने आता त्याचे डोळेबंद केले आनी उभाराहिला ! त्याला वाटले चला आता मारायलातयार व्हावे !इतक्यातएक आवाज आला बाबाथाम्बा त्यांना मारु नका ! तोआवाज राधाचा होता जी रामरावचीमुलगी होती !रामराव्: नहीं पोरी तू मधेपडु नको ह्याने माझाअपमान केला , शिक्षा तर ह्याला मिळनार!राधा: बाबा त्या दिवशी जरह्यानी माझे मदद केलेनस्ती तर तुम्ही आजजिवंत नसता !रामराव्: हो बाबा मी खराबोलते आहे , त्या दिवशी मीएक मिनीट जरी घरी यायलालेट झाल असत, तरतुमचा हार्ट अटैक ने त्याचदिवशी मृत्यु झाला असता ! त्यादिवशी माझी गाड़ी ह्यानीचसुरु केली होती आनीत्यामुळेच मी घरी वेळेवरपोहचू शकले आनी तुमच्याहार्ट अटैक वर तातडीनइलाज करू शकले, खरतर ह्यानीच तुमचा जीव वाचवला  आनी आज तुम्हीह्यांनाच मारायला नीघालत हां कुठला न्यायआहे बाबा !आपल्यामुलीच स्पष्ट बोलन ऐकून रामराव् थक्काझाले ! त्यांची बंदूक त्यांच्या हातातून खाली पडली आनते सोफया वर मटकन बसले!   राधाने त्यांना सावरल आनी म्हणाली !राधा: बाबा जर ह्यानी त्यांचेकर्तव्य पार पाड़ले तरतुम्ही का त्यांना आडकाठीआनत आहात, त्यांना त्यांचे काम करू दया! पुष्कर माफ़ करा माझ्याबाबांच्या वतीने मी तुमची माफीमागते !पुष्कर: राधा तुम्ही माफी नका मागु! आनी जर मागायची असेलतर ती समस्त गावतिललोकांची मागा ज्यांच्या मुलांचीशिक्षणाचे वाट आज तुमच्यावडिलांकडून बंद झाली आहे!माझीतुमच्या वडिलांना विनंती आहे के त्यांचीकीर्ति खूप मोठी आहेत्यांनी काही कपटी लोकांचे ऐकूनगावा बद्दल जे वैर मनात कोरले आहे ते सोडून द्यावे! समस्त गांवच काय ते यातालुक्याचे नेतृत्व करू शकतात! फ़क्तत्यानी समाजसेवा करने सोडू नयेआनी ही सगळ्या गावकरीलोकांची सुद्धा इच्छा आहे ! राधाने पुष्कर ला बसायला विनंतीकेली, बाकी लोकांना बाहेरजायला सांगीतले आता राधा नेदोघांना पानी दिल पुष्करआनी राम् राव घटाघटा पानी प्याले ! बरचवेळ ते दोघे एकमेकाकडे बघत होते !मगराधा ने राम रावना म्हटले राधा: बाबा आता झाले गेलेविसरुन जा थोड़े शांतझोपा मी तो पर्यंतपुष्कर सरांना गावात सोडून येते रामरावयानी राधा व पुष्करकड़े बघितला व जा असाइशारा केला !पुष्करने हात जोड़ून रामरावह्यांना नमस्कार केला आने तोराधा बरोबर गाडीत बसून गावाकडे परतला!गावातपुष्कर सर गायब झाल्याची बातमी पसरली होती व त्यामुळे सगळे लोक पाराजवळ जमले होते त्यांच्यामनात आक्रोश होता !तेवाच राधा ची गाड़ी पाराजवळ थांबली व पुष्कर त्या गाड़ीतुन उतरला, त्याला बघून लोकांची मने शांतझाली ! राधा: पुष्कर मी येते आता! चिंता नसावी मी बाबाना समजावते!आनीती तिथुन निघून जाते !
काही दिवसात गावतले वातावरणनेहमी प्रमाणे नीवते ! नंतरएक दिवस सरपंच एक सभा भरवतात, ज्यामधे ते रामरावा कडूनशाळा बांधकामावरचा स्टे उठवल्याची बातमीसगळ्यांना देतात सगळे गावकरी त्यामुळेआनंदित होतात आनी दुसऱ्या दीवशीपासून शाळा बांधकाम परतजोमाने सुरु होते !काहीमहिन्यात ती बान्धुन पूर्णहोते, शाळा उद्घाटनाला काहीदिवस बाकी असताना सरपंचहेड सर व पुष्करला बोलावतातमाधवभाऊ: हेड सर आताउदघाटनाचा दिवस जवळ आहेआनी माझ्या मते ! तुम्ही दोघांच्या हस्ते हे उद्घाटन व्ह्यावअस मला वाटते !हेडसर : फ़क्त पुष्कर च्याप्रयत्न मुले आज हांदिवस आम्हाला दिसला तर माझ्या मतेत्याने हे उद्घाटन करावअस मला वाटते ! कायपुष्कर तू तयार आहेस!पुष्कर: सर मला माफ़ करापन माझ्या मते रामराव् ह्याकरता योग्य आहेत, कारन ज्या जमीनीवर आपली शाळा उभीआहे ती जमीन त्यांच्यापूर्वजानी गावच्या कल्याण करीता सरकारला वापराकरीता दीलीआहे ! माधवभाऊ: ठीक आहे पनते उद्घटनाला येतील का !पुष्कर: हो आपण आनी गावातीलमोठी लोक जर स्वता जाऊंन त्यांना निमंत्रण देऊ तर तेनक्कीच येतील !माधवभाऊ: ठीक आहे आजचनिमंत्रण पत्रिका घेऊन आपण जाऊ!ठरल्याप्रमाणे सर्व मंडळी रामरावनाप्रमुख पाहुने म्हनून आमंत्रण दयायला जातात आनी रामराव् देखीलसगळ्याचे स्वागत करून त्यांचे आमंत्रणस्वीकारतात ! ठरल्याप्रमाणे उद्घाटनाची पहाट येते ! सगळेगावकरी ठरल्या प्रमाणे उद्घाटन स्थली पोहचतातपनरामरावांचा पत्ता नसतो ! त्त्यांच्या फ़ोन लागत नाहीव घरी माणसे पाठवलीअसता असे महित पड़लेकी ते व राधासकाळपासून कुठे तरी गेलेत!आताउद्घाटनस्थळी उपस्थित सगळी मंडळी चिंतित होतात ! जर रामराव् नाहींआले तर उद्घाटन कसकरायचा ह्याचा विचार सगळ्यांना पड़तो !माधवभाऊ: पुष्कर तुम्ही करता का उद्घाटननाहीं तर खूप वेळ झाला वाट पाहून ! पुष्कर: नाहीं सरपंच साहेब, मला अजूनही खात्रीआहे की रामराव उद्घाटनालायेतील आपण अजुन थोड़ावेळ त्यांची वाट पाहू !आनीकाही मिनट गेली असतांनारामरावांची गाड़ी तिथे येऊनपोहचते ! गाड़ी तुन रामराव्उतरतात, त्यांना बघून सरपंच, हेड सर वपुष्कर त्यांच्या स्वागताला हार व पुष्पगुच्छाघेऊन पुढे होतात !रामराव: माफ़ करा मंडळी थोड़ाउशीराच झाला, काही महत्वाच्या व्यक्तींनाउद्घटनाला घेऊन आलो आहेचला तर मग लवकरउरकून घेऊ सोहळा गावातीलमंडळी वाट पाहत असतील!  सगळेबुचकळ्यात पडतात की आता उद्घाटनकोण्याच्या हस्ते होणार !माधवभाऊ: रामराव भाऊ कुठ आहेतत्या महत्वाच्या व्यक्ति रामराव: राधा ! त्यांना गाड़ी तुन बाहेरघेऊन ये .सगळ्यांचेलक्ष गाड़ी च्या दरवाज्याकड़े जाते पहीलेगाडीतून राधा बाहेर उतरते!राधा: आई बाबा ! या आता बाहेरआपण पोहोचलो!आनी लगेच एक म्हाताराम्हातारी गाड़ीतुन बाहेर उतरतात, पुष्कर त्यांना बघून अचानक उद्गगारतो आईबाबा तुम्ही इथे कसे काय!सगळयाना रामराव् ह्यांचामोठेपणा कळुन चूकतो, जेत्या पुष्कर च्या आई बाबाच्याहस्ते शाळेचे उद्घाटन करणार असतात ज्याच्या प्रयत्नाने ही शाळा खऱ्याअर्थाने सुरु झाली !पुष्करत्याच्या आई बाबांना बघून खूप खुश होतोव त्याच्या डोळ्यात आनंदाश्रु येतात !आतासमस्त मंडली शाळेच्या उद्घाटन फीत जवळ येतातपुष्करच्या आई बाबा च्याहातात राधा कैची देतेव त्यांच्या कडून फीत कपूनउद्घाटन सम्पन्न होते, टाळ्याचा कड़कड़ाट होतो !    सगळेगांवकरी मोठ्याने म्हणतात गांव देव "ज्योतिबाच्यानावाने चांगभल" पुष्करमाइक घेऊन भाषणाला उभाराहतो !पुष्कर: गावकरी मंडळी ऐका आज जोतिबा देवाच्या कृपेने व इथे उपस्थितसमस्त लोकांच्या सहकारने गावातील सगळ्या मुलांकारिता बनलेली ही शाळा म्हणजे जणूशिक्षणातील एक सोनेरी पहाटआहे आनी म्हणूनच "शिक्षणाच्यासुद्धा नावाने चांगभल "तिथेजमलेले सगळे एक सूरातम्हणतात "ज्योतिबाच्या नावाने चांगभल" " शिक्षणाच्या नावान चांगभले “
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on November 10, 2019 08:38
No comments have been added yet.